प्रतिनिधी
मुंबई : तिकडे कर्नाटकात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी साप म्हणाले, तर इकडे मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जीभ घसरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोडे पुसायची लायकी नसलेले राज्यकर्ते अशा शब्दांमध्ये शरसंधान साधले. यानंतर कर्नाटकात भाजपने आणि महाराष्ट्रात शिंदे गटाच्या नेत्यांनी खर्गे – ठाकरे जोडगोळीवर तुफानी प्रतिहल्ला चढविला आहे. Rulers who wipe their joints, Uddhav Thackeray’s loose tongue
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीर सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विषारी सापासारखे आहेत. त्यांचे विष चाखायला जाऊ नका ते तुम्ही चाखलेत तर मराल!!, अशा अश्लाघ्य शब्दांत निशाणा साधला. त्यावर भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या सरंजामशाहीवर तुफानी प्रतिहल्ला चढवला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आदी नेत्यांनी काँग्रेसच्या सरंजामी नेतृत्वावर जोरदार शरसंधान साधले आहे, तर इकडे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिखट हल्ला चढविणारे ट्विट केले आहे.
शिवसेनेच्या कामगार सेनेच्या कार्यक्रमात शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरेंची जीभ घसरली. एकनाथ शिंदे यांना उद्देशून जोडे पुसायची लायकी नसलेली राज्यकर्ते, असे उद्गार उद्धव ठाकरेंनी काढले. त्याचवेळी माझ्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघाताने आलेले सरकार घालवून सूड घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. उद्धव ठाकरेंच्या उद्गारांना एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले.
एकनाथ शिंदे म्हणतात :
काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की.
शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधत त्यांच्या सरंजामी वृत्तीवर टीका केली आहे. जोडे पुसून घेणे ही सरंजामशाही आहे आणि महाराष्ट्रात इथून पुढे हेवपॅलेस पॉलिटिक्स चालणार नाही. आम्हाला तुमच्याविषयी आदर आहे. पण म्हणून तुम्ही वाट्टेल ते बोलाल, तर आम्ही खपवून घेणार नाही. उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी प्रत्येक मुद्द्याला उत्तर देईन, असा इशारा केसरकर यांनी दिला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर केलेल्या विषारी साप या टीकेनंतर भाजपमध्ये देखील मोठा संताप उसळला असून पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसने किती वेळा नरेंद्र मोदींना शिवीगाळ केली, याची यादीच सादर केली आहे. त्या यादीनुसार काँग्रेस नेत्यांनी एक-दोन वेळा नव्हे, तर 91 वेळा अश्लाघ्य शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींवर टीका केल्याचे दिसून येते यामध्ये “मौत के सौदागर” पासून मोदी तेरी कबर खुदेगी, विषारी सापापर्यंत वाट्टेल ते शब्दप्रयोग करून काँग्रेसने मोदींना टार्गेट केल्याचे दिसत आहे.
Rulers who wipe their joints, Uddhav Thackeray’s loose tongue
महत्वाच्या बातम्या
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा राहुल गांधींना सवाल, ‘हिंमत असेल तर पवारांच्या अदानींसोबतच्या संबंधांवर प्रश्न विचारा?’
- Operation Kaveri: सुदानमधून भारतीयांना घेऊन दिल्लीत पोहोचले विमान, नागरिकांच्या ‘भारतीय सेना झिंदाबाद, पीएम मोदी झिंदाबाद’च्या घोषणा
- पुंछ हल्ल्यानंतर पाकिस्तानला भरली धडकी, आणखी एका ‘सर्जिकल स्ट्राईक’ची भीती
- चीनच्या प्रत्येक कृतीला भारतही देणार जशास तसे उत्तर! LAC वर रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर फोकस