• Download App
    RTPCR report of those coming to Konkan for Ganeshotsav is required; Citizens who have taken two doses of the vaccine, however, are not bound

    गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांचा RTPCR अहवाल हवाच; लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मात्र बंधन नाही

    वृत्तसंस्था

    सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या आणि कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना RTPCR अहवाल असणे बांधनकारक केले आहे. याबाबतची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. RTPCR report of those coming to Konkan for Ganeshotsav is required; Citizens who have taken two doses of the vaccine, however, are not bound



    कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव लवकरच सुरू आहे. त्यासाठी चाकरमान्यांची गावाकडे तयारी सुरु आहे. कोरोनाचे सावट आणि संकट यामुळे अनेक जण गावाकडे जावे की न जावे, या चिंतेत पडले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात प्रवेश करताना लसीच्या दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नाही. मात्र ज्‍या नागरिकांनी लसीच्‍या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्‍या नाहीत. त्‍यांनी जिल्‍ह्यात प्रवेशापूर्वी ७२ तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगावा लागणार आहे. परंतु १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्‍याने त्‍यांच्या आरटीपीआर चाचणी अहवालाची गरज नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

    RTPCR report of those coming to Konkan for Ganeshotsav is required; Citizens who have taken two doses of the vaccine, however, are not bound

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस