• Download App
    औंध ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम निविदेव्दारे ; राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी मानले आयुक्तांचे आभारRoad work from Aundh to Jagtap Dairy Chowk through tender Rahul Kalate and Prashant Shitole thanked the Commissioner

    औंध ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम निविदेव्दारे ; राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी मानले आयुक्तांचे आभार

    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : स्मार्ट सिटीअंतर्गत औंधच्या राजीव गांधी पूल ते जगताप डेअरू चौकापर्यंतच्या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार काम करण्यात येणार होते. ते सुमारे ४० कोटींचे काम स्मार्ट सिटीचे ठेकेदार बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्सनला थेट पध्दतीने देण्याचा घाट घातला होता. Road work from Aundh to Jagtap Dairy Chowk through tender Rahul Kalate and Prashant Shitole thanked the Commissioner

    मात्र, तक्रारीनंतर आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी त्यासाठी निविदा राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते. कलाटे म्हणाले की, औंध ते किवळे या १४ किलोमीटर अंतराच्या बीआरटीएस रस्ता चांगल्या स्थितीत आहे. असे असतानाही नागरिकांची मागणी नसताना या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार काम केले जात आहे. तसेच ड्रेनेज समपातळीवर करुन डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी एकूण सुमारे १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कामाची गरज नसताना केवळ टक्केवारीसाठी सत्ताधाऱ्यांनी काम काढले आहे.

    ते काम ठराविक ठेकेदाराला थेट पध्दतीने देण्याचा घाट घातला आहे. त्याबाबत आयुक्तांकडे तक्रार करीत सुनावणीची मागणी केली होती. या तक्रारींची दखल घेत औंध ते जगताप डेअरी रस्ताचे काम थेट पध्दतीने न देता निविदा काढण्यात येणार असल्याचे उत्तर आयुक्तांच्या वतीने स्मार्ट सिटीते महाव्यवस्थापक अशोक भालकर यांनी दिले आहे.

    Road work from Aundh to Jagtap Dairy Chowk through tender Rahul Kalate and Prashant Shitole thanked the Commissioner

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ