• Download App
    बाकीची सर्वेक्षणे खोटी, राष्ट्रवादीच्या सर्वेक्षणात राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी भक्कम; जयंत पाटलांचा दावा|Rest of the surveys are false, NCP and Mahavikas Aghadi strong in NCP survey; Jayant Patil claim

    बाकीची सर्वेक्षणे खोटी, राष्ट्रवादीच्या सर्वेक्षणात राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी भक्कम; जयंत पाटलांचा दावा

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संदर्भात एकापाठोपाठ एक दोन सर्वेक्षणांमधून आलेल्या निष्कर्षांनुसार शिवसेना – भाजप युती राज पूर्ण बहुमत मिळण्याचे भाकीत वर्तविले आहे. महाविकास आघाडी टिकली तरी ती बहुमताच्या आसपास जात नसल्याचे आकडेवारी सांगत आहे. तरी देखील ही दोन्ही सर्वेक्षणी खोटी असून राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.Rest of the surveys are false, NCP and Mahavikas Aghadi strong in NCP survey; Jayant Patil claim

    झी न्यूज आणि न्यूज एरिना इंडिया या दोन वृत्तसंस्थांनी केलेल्या सर्वेक्षणांमधून महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीलाच संपूर्ण बहुमत मिळण्याचे भाकीत केले आहे. झी न्यूजच्या सर्वेक्षणात शिवसेना भाजपला 165 ते 185 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे, तर न्यूज एरिना इंडियाच्या सर्वेक्षणात भाजप आपले जुने रेकॉर्ड तोडून 125 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे. यात युतीला बहुमत गृहीतच धरले आहे.



    पण या सर्वेक्षणाच्या बातम्या खोट्या असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी भक्कम आहे. आमचे निष्कर्ष तसेच आहेत, असे ते म्हणाले.

    त्याचवेळी शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याच्या वेळी जयंत पाटलांच्या रडण्याचे रहस्य लवकरच समोर येईल. जयंत पाटील भाजपमध्ये दाखल होतील, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा जयंत पाटलांनी इन्कार केला.

    Rest of the surveys are false, NCP and Mahavikas Aghadi strong in NCP survey; Jayant Patil claim

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य