• Download App
    पृथ्वीवर आपल्या नावावर घर नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांचा सांगलीत स्वतःच्या नावावर 3 कोटींचा बंगला!! Don't have house on the earth, claimed jayant patil, but holds 3 cr. benglow property in sangli

    पृथ्वीवर आपल्या नावावर घर नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांचा सांगलीत स्वतःच्या नावावर 3 कोटींचा बंगला!!

    2019 च्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या संपत्ती विवरणातून आकडा जाहीर

    प्रतिनिधी

    मुंबई : आपण कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. या पृथ्वीतलावर आपल्या नावावर घर नाही. त्यामुळे आपल्याला ईडी चौकशीची भीती वाटत नाही, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावावर सांगलीत सुमारे 3 कोटी रुपयांचा बंगला आहे. ही माहिती ईडी, सीबीआय किंवा अन्य कुठल्याही तपासणी यंत्रणांनी बाहेर काढली नसून दस्तूरखुद्द जयंत पाटील यांच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील संपत्ती विवरण प्रतिज्ञापत्रातच त्यांनी स्वतः दिली आहे. Don’t have house on the earth, claimed jayant patil, but holds 3 cr. benglow property in sangli

    सांगलीच्या यशवंत कॉपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी सर्वे नंबर 93550, 1351 आणि 1352 या जागेवर जयंत पाटलांचा बंगला आहे आणि त्याची किंमत त्यांनीच प्रतिज्ञापत्र नमूद केल्यानुसार 2,94,65,788 रूपये एवढी आहे. या बंगल्याचे मालक ते स्वतः आहेत, असेच त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

    https://myneta-info.translate.goog/maharashtra2019/candidate.php?candidate_id=7557&_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc

    याखेरीज जयंत पाटलांच्या नावे करोगाव मध्ये शेत जमीन असून तिची किंमत त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार 42,03,563 रूपये एवढी आहे, तसेच जयंत पाटलांच्या नावे कासेगांव मध्ये अकृषी जमीन असून तिची किंमत 84,66,022 रूपये एवढी आहे, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. जयंत पाटलांच्या एकूण अचल संपत्तीचा आकडा त्यांनीच नमूद केल्यानुसार
    4,22,35,373 अर्थात 4 + कोटी रूपये एवढा आहे.

    तसेच जयंत पाटलांच्या एकूण चल संपत्तीचा आकडा 12,01,61,550 अर्थात 12 + कोटी रूपये असून जीवनसाथी अर्थात पत्नीच्या संपत्तीचा आकडा 71,21,781 अर्थात 71 + लाख रूपये आहे.

    Don’t have house on the earth, claimed jayant patil, but holds 3 cr. benglow property in sangli

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील

    Madhavi naik : भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

    भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!