प्रतिनिधी
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे संशोधन आणि साहित्य यांचे कलादालन छत्रपती शिवाजी महाराज उद्याना (शिवाजी पार्क) संयुक्त महाराष्ट्र कलादालनात उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.Research of Shivshahir in Mumbai – Literature Art gallery raised; BJP’s demand
भावी पिढ्यांसमोर शिवशाहीर बाबासाहेबांचा जीवनपट आणणे हीच खरी शिवशाहिरांना आदरांजली ठरेल, असे शिंदे म्हणाले.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी घराघरात पोहोचवला त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले.
शिवशाहीर जरी आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांनी केलेले विपूल लेखन, साहित्य आणि ऐतिहासिक संशोधन हे पुढच्या पिढीला उपलब्ध करुन देणे.त्यांचा जीवनपट त्या निमित्ताने भावी पिढ्यांसमोर आणणे हीच त्यांना खरी आादरांजली ठरेल आणि भारतीय पक्षाचा गटनेता म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतिशय नम्र विनंती करतो की,
शिवाजी पार्कसमोरील संयुक्त महाराष्ट्र कलादालन ज्या ठिकाणी आहे, त्याच्या पहिल्या माळ्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन उभे करण्यासाठी मुंबई महापालिकेने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
Research of Shivshahir in Mumbai – Literature Art gallery raised; BJP’s demand
महत्त्वाच्या बातम्या
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा रश्मी ठाकरे यांना फोन; मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची केली चौकशी
- WATCH : शिवसेनेच्या पुढाकाराने सांगलीत एसटी धावली ; शिवसैनिकांनी शहरी बसेसला दिले संरक्षण
- राजस्थानात गेहलोत मंत्रिमंडळात बदल; सचिन पायलट आनंदी; पण आमदार शफिया झुबैर मात्र दुःखी!!
- सदाभाऊ आघाडी सरकारचे तेरावे घालणार; एसटीच्या विलीनीकरणावर सरकार महाधिवक्त्यांशी चर्चा करणार!