हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर कारखान्याकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विजबिलाची वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असे करणे बेकायदेशीर असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.Recovery of overdue electricity bills from farmers Raju Shetty is aggressive will ignite agitation in kolhapur
प्रतिनिधी
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर कारखान्याकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विजबिलाची वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असे करणे बेकायदेशीर असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
अभिजीत कलगोंडा पाटील यांना मिळालेल्या ऊसबिलाच्या पावतीवर महावितरणची थकीत बाकी तीन हजार रुपये कारखान्याने ऊस बिलातून परस्पर वळती केल्याचे स्पष्टपणे छापून आले आहे. या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, जी वीज आम्ही वापरत नाहीत, त्याची बिलं आलेली आहेत, यासाठी दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. बिलं दुरुस्त करून द्या, आम्ही भरायला तयार आहोत, असं आम्ही वारंवार सांगितलं आहे. ज्या ज्या वेळी बिलं दुरुस्त करून देण्यात आली, त्या त्या वेळी शेतकऱ्यांनी ती भरली आहेत.
असं असताना सदोष बिलाच्या रकमेपोटी साखर कारखान्यातून परस्पर रक्कम महावितरणला वळती करण्याचा प्रकार सुरू आहे. असं करणं हे बेकायदेशीर आहे. शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कुणीही त्याच्या ऊस बिलाची रक्कम वळती करू शकत नाही. कायद्यानं हा गुन्हा आहे. यामुळे महावितरण कंपनी आणि कारखान्याच्या चेअरमनविरोधात आम्ही आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
Recovery of overdue electricity bills from farmers Raju Shetty is aggressive will ignite agitation in kolhapur
महत्त्वाच्या बातम्या
- जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला सुवर्णमंदिर भेटीचा पीएम मोदी आणि राहुल गांधींचा फोटो, देवाला पाठ दाखवल्यावरून टीका, नेटकऱ्यांनी आव्हाडांनाच केले ट्रोल
- Budget 2022-23 : 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, शेतकऱ्यांबाबत होऊ शकतात महत्त्वाच्या घोषणा
- पुण्यात शाळा १ फेब्रुवारी पासून
- Beating Retreat Ceremony : ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा आज, पहिल्यांदाच 1000 ड्रोनचा खास शो, प्रोजेक्शन मॅपिंगही दाखवण्यात येणार