वृत्तसंस्था
पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मागील 50 दिवसांत शहरात सक्रीय रुग्णांची संख्या 52 हजार 847 ने कमी झाली आहे. Record decline in corona patients in Pune, 53,000 cured; Picture in 50 days
एप्रिलमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 56 हजारावर पोचली होती. दुसऱ्या लाटेत अनेकांची तारांबळ उडाली होती. आता शहरात 3 हजार 699 सक्रीय रुग्णसंख्या आहे. त्यामुळे शहरात सध्या 8 हजाराहून अधिक बेड शिल्लक आहेत.
पुणे शहरात 18 एप्रिल 2021 रोजी रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला होता. या दिवशी शहरात एकूण सक्रिय रुग्णांची 56 हजार 546 वर पोचली होती. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. पण दरम्यान राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पुण्यात कोरोनाचा आलेख घसरायला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील 50 दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे.
PMNRF : पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे आगीतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत
पुण्यात 8 हजार 229 खाटा रिकाम्या
28 एप्रिल 2021 रोजी रुग्णांची सर्वाधिक संख्या 10 हजार 398 होती. त्यानंतर ही संख्या 40 दिवसांपासून कमी होत गेली. सध्या 3 हजार 699 सक्रिय रुग्ण उरले आहेत. यातील 1 हजार 969 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 1 हजार 730 रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले आहे. त्यामुळे पुण्यात 8 हजार 229 खाटा रिकाम्या झाल्या आहेत.
Record decline in corona patients in Pune, 53,000 cured; Picture in 50 days
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग होतो ; कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नाही : डॉ. रणदीप गुलेरिया
- हैदराबादमध्ये गरिबांना भेटला देवदूत, डॉ. व्हिक्टर करतात दहा रुपयात कोरोना रुग्णांवर उपचार
- सुवेंदू अधिकारी यांनी घेतली अमित शहांची भेट, तृणमुल कॉंग्रेसचे टीकास्त्र
- उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांत कोरोना संसर्ग घटला, संचारबंदी शिथील
- निवडणुकीतील पराभवामुळे केरळच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना डच्चू
- विज्ञानाची गुपिते : जगात चित्ताच का सर्वांधिक वेगाने धावतो
- कोरोनावर ‘डीएनए’ आधारित लस प्रभावी, तैवानच्या शास्त्रज्ञांचा दावा
- केरळच्या मुख्यमंत्र्यांचा एक महाल बने न्यारा, शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठी करणार एक कोटी रुपये खर्च