वृत्तसंस्था
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील थंड हवेचे आणि पावसाचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. यंदा २२ व २३ जुलै दरम्यान एका दिवसात पडलेल्या पावसाने गेल्या सव्वाशे वर्षातील विक्रम मोडला आहे. आठ दिवसांत २१०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.Record Breck rain in Mahabaleshwar for 125 years ; 2100 mm of rainfall in 8 days
२२ जुलैला महाबळेश्वर येथे ४८० मिमी पावसाची नोंद झाली. त्याच्या दुुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी ५९० मिमी नोंद झाली होती. यापूर्वी ७ जुलै १९७७ रोजी एकाच दिवशी ४३९.८ मिमी विक्रमी नोंद होती. जुलै महिन्यातील २४ तासात पडलेला हा विक्रमी पाऊस होता. यंदा २२ व २३ जुलै रोजी पडलेल्या पावसाने हा विक्रम मोडला आहे.
हवामान विभागाकडे १८९६ पासून पावसाच्या नोंदी आढळून येतात. त्यानुसार जुलै महिन्यात १८९६ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी पाऊस ४८६६.९ मिमी पाऊस पडला होता. यंदा आतापर्यंत १ जूनपासून महाबळेश्वरमध्ये ४०३० मिमी पावसाची नोंद झाली असून यंदा जून मध्ये १२८९.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आतापर्यंत जुलै महिन्यात २८४१ मिमी पाऊस झाला आहे.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार महाबळेश्वरमध्ये जुलै महिन्यात सरासरी २०६४.४ मिमी पाऊस होतो. यंदा गेल्या १९ जुलैपासूनच केवळ ८ दिवसात २१०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.महाबळेश्वरप्रमाणेच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक ठिकाणी पडलेला पाऊस मोजला नसल्याने त्याची नोंद झाली नाही.
पावसामुळे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळन्याच्या घटना घडल्या.गेल्या १० वर्षात ३१ जुलै २०१४ रोजी २४ तासात ४३२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, १६ जुलै २०१८ रोजी २९८ .७ मिमी पावसाची नोंद झाली होती.
यंदा महाबळेश्वरमध्ये २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)
- १९ जुलै २०२१ – १००
- २० जुलै – ११०
- २१ जुलै – १६०
- २२ जुलै – ४८०
- २३ जुलै – ५९०
- २४ जुलै – ३२०
- २५ जुलै – १९०
- २६ जुलै – १५०
Record Breck rain in Mahabaleshwar for 125 years ; 2100 mm of rainfall in 8 days
महत्त्वाच्या बातम्या
- 100% सवलतीच्या पहिला दिवसा : दिल्ली मेट्रोमध्ये 17.5 लाख प्रवाश्यांनी प्रवास केला, तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 159 दंड ठोठावला..
- ममता बॅनर्जी पाच दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीला , आज पंतप्रधानांना भेटणार..
- 98 टक्के संरक्षण कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे मिळाले दोन्ही डोस : संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट
- इंडोनेशियात कोरोनामुळे शेकडो मुलांचा मृत्यू, जगाची चिंता वाढली
- पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान खान यांच्या तेहरीके इन्साफचा विजय, निवडणूक बेकायदा असल्याची भारताची भूमीका