• Download App
    पोलिस अधिकारी असल्याचे सांगून खंडणी, अपहरण प्रकरणी तिघांना पुण्यात अटक । Ransom for being a police officer, Three arrested in Pune kidnapping case

    पोलिस अधिकारी असल्याचे सांगून खंडणी, अपहरण प्रकरणी तिघांना पुण्यात अटक

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यात अपहरणाची आणखी एका धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे शहर पोलिसांनी दोन एलपीजी सिलिंडर वितरण कर्मचार्‍यांचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना अटक केली. कर्मचार्‍यांचा कुटुंबीयांकडून २ लाख रुपये उकळल्यानंतर त्यांची सुटका केली. Ransom for being a police officer, Three arrested in Pune kidnapping case

    सुदर्शन किशोर गंगावणे (२५ , रा. बिबवेवाडी), विकास तुकाराम कोडितकर (३० , रा. जांभूळवाडी) आणि सतीश सुधीर वांजळे (३३ , रा. आंबेगाव, दत्तनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



    १५ मार्च रोजी, सहा जणांच्या गटाने एका वाहनात चार आणि दोन मोटारसायकलवरून चतुरश्रृंगी मंदिराजवळ एलपीजी सिलिंडर घेऊन जाणारा टेम्पो थांबवला. गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून भासवून या सहा जणांनी बेकायदेशीरपणे एलपीजी सिलिंडर विकण्याचा दोघांवर आरोप केला. टेम्पो आणि कायदेशीर कारवाईची धमकी दिली. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी दोघांकडून ५ लाख रुपये मागितले.

    Ransom for being a police officer, Three arrested in Pune kidnapping case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?