• Download App
    रमाई आवास घरकुल योजना , राज्यात सुमारे सव्वा लाख घरे बांधण्यात येणार ; धनंजय मुंडेंची महत्वाची घोषणाRamai Awas Gharkul Yojana, about one and a half lakh houses will be constructed in the state; Important announcement of Dhananjay Munde

    रमाई आवास घरकुल योजना , राज्यात सुमारे सव्वा लाख घरे बांधण्यात येणार ; धनंजय मुंडेंची महत्वाची घोषणा

    सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव अ. को. अहिरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिल्याचा निर्णय निर्गमित केला आहे.Ramai Awas Gharkul Yojana, about one and a half lakh houses will be constructed in the state; Important announcement of Dhananjay Munde


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजना निर्माण करण्यात आली आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे म्हणून राज्य सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत.

    यावेळी राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घरकुल योजने बाबत घोषणा केली आहे. रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत राज्यात सुमारे सव्वा लाख घरे बांधण्यात येणार आहेत.सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव अ. को. अहिरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिल्याचा निर्णय निर्गमित केला आहे.



    रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेनंतर्गत राज्यात ग्रामीण भागात १ लाख १३ हजार ५७१ व शहरी भागात २२ हजार ६७६ रकुलांच्या उद्दिष्टास मंजुरी देण्यात आली आहे. तशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ग्रामीण आणि शहर भागात बांधण्यात येणाऱ्या या घरकुल योजनेच्या उद्दिष्टांना आज मंजुरी देण्यात आली आहे.

    यावेळी पुढे धनंजय मुंडे म्हणाले की , या योजनेतून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात या उद्दिष्टात आणखी वाढ करण्यात येईल. तसेच या योजनेस कुठेही निधीची कमतरता भासणार नाही, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

    Ramai Awas Gharkul Yojana, about one and a half lakh houses will be constructed in the state; Important announcement of Dhananjay Munde

    Related posts

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

    Nilesh Ghaiwal, : लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला; यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती

    Mumbai BMC : मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर; 11 नोव्हेंबरला सोडत, तर 28 तारखेला अंतिम आरक्षण