विशेष प्रतिनिधी
रायपूर : उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान हर हर महादेवच्या बरोबरच अल्ला हू अकबरच्या घोषणा देणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही भोंगे हटविण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.Rakesh Tikait announces Allah Hu Akbar at farmers’ rallies support demand for loudspeaker removal
राकेश टिकैत म्हणाले, सर्वाधिक आवाज करतात असे भोंगे बंद झाले पाहिजेत. मग ते मंदिर असो किंवा मशिद. कुठंही लाउड स्पिकर नकोय. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले, ते चांगले झाले. लाउड स्पिकर बंद व्हावे ही भाजपची नाही तर जनतेची मागणीय. त्यामुळं ते झालं पाहिजे.
शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी राकेश टिकैत रायपूर इथं पोहोचले होते. 27 गावांचं भूमी अधिग्रहणाचं प्रकरण आहे. 20 ते 25 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा, त्यांना जमिनीचा योग्य दर मिळावा, यासाठी टिकैत आग्रही भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोलणं झालेलं नाही. समितीशी आज बोलणार आहोत, असं टिकैत यांनी सांगितलं.