प्रतिनिधी
मुंबई – ठाण्यात अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची बोटे छाटणाऱ्या परप्रांतीय भाजीवाल्याला अटक झाली आहे. पण तो जामिनावर सुटू देत, मनसैनिक त्याला बघून घेतील. तो मनसेच्या सैनिकांचा मार खाईल. परप्रांतीयांची मस्ती आम्ही जिरवूच, असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. raj thackeray targets thackeray – pawar govt over mandir issue
मुंबई आणि ठाण्यात परप्रांतीय एवढे माजलेत की त्यांची हिंमत होतेय अधिकाऱ्यांची बोटे छाटण्याची. सरकार कारवाई करते असे म्हणते पण त्यांना कशाचे गांभीर्य नाही. परप्रांतीयांची मस्ती जिरवलीच पाहिजे. ती सरकार जिरवू शकत नसेल, तर आमचे मनसैनिक परप्रांतीयांची मस्ती जिरवतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतरही मुंबई, ठाण्यात आज काही ठिकाणी हा मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दहीहंडीसह सगळे सण साजरे करण्याचे आदेश दिलेत. मंदिरे उघडलीच पाहिजेत. त्यांना घराबाहेर पडण्याची भीती वाटते म्हणून ते सणांवर बंदी घातली आहे. आम्ही ती बंदी मानत नाहीत. मनसेने दहीहंडी साजरे करण्याचे आदेश मीच दिले आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
raj thackeray targets thackeray – pawar govt over mandir issue
महत्त्वाच्या बातम्या
- 70 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी 9 न्यायाधीशांचा शपथविधी, कोरोना प्रोटोकॉलमुळे विशेष कार्यक्रम
- Orange Alert Mumbai rains : मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी पुढील तीन दिवस पावसाचे ; ऑरेंज अॅलर्ट जारी
- IRCTC New Rule : तिकीट बुकिंगचे नियम बदलले; व्हेरिफिकेशन सक्तीचं ; तारीख बदलता येणार ll वाचा सविस्तर