• Download App
    बाळासाहेबांच्या नावाने "हडपलेल्या" महापौर बंगल्यावर...!!; राज ठाकरेंचे शिवसेनेवर तिखट वार|Raj Thackeray targets shiv sena over mayor banglow Balasaheh Thackeray memorial

    बाळासाहेबांच्या नावाने “हडपलेल्या” महापौर बंगल्यावर…!!; राज ठाकरेंचे शिवसेनेवर तिखट वार

    प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे – पवार सरकारने सणांवर लादलेल्या बंदीमुळे राज ठाकरे चांगलेच संतापले असून, त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुसरी, तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत.Raj Thackeray targets shiv sena over mayor banglow Balasaheh Thackeray memorial

    वढेच नाही तर बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरुन थेट नाव घेऊन टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत



    राज ठाकरे हे सरकारवर टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत नाहीत किंवा क्वचितच घेतात परंतु यावेळी मात्र त्यांनी थेट बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला टार्गेट केल्याने या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.

    सणांवरच बंदी का?

    बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झाल्याचे दिसत नाही. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही, तर या सणांवरच बंदी का घातली जाते? त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना जोरात दहीहंडी उत्सव साजरा करा जे होईल ते होईल, असं सांगितलं होतं असे राज ठाकरे म्हणाले.

     लॉकडाऊन आवडे सरकारला

    गेल्या वेळच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती सध्या झाली आहे. कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी, तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही.

     हे फक्त महाराष्ट्रातच का?

    हे फक्त महाराष्ट्रात, मुंबईत का? बाकीच्या राज्यांचे काय? जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही? यांना जे हवे तेवढे वापरायचे आणि बाकीचे बंद करुन इतर जनतेला घाबरवून ठेवायचे, असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला आहे.

    Raj Thackeray targets shiv sena over mayor banglow Balasaheh Thackeray memorial

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!