गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेतील राज ठाकरे यांच्या भाषणाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. मनसे प्रमुखांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आपल्या खास शैलीत हल्लाबोल केला. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर बोट ठेवून यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप केला.Raj Thackeray On Sharad Pawar Sharad Pawar wants caste politics, it started only after the birth of NCP – Raj Thackeray
प्रतिनिधी
मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेतील राज ठाकरे यांच्या भाषणाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. मनसे प्रमुखांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आपल्या खास शैलीत हल्लाबोल केला. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर बोट ठेवून यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप केला.
‘जातीपातीत गुंतून पडलो तर कसलं हिंदुत्व?’
राज ठाकरे म्हणाले की, आपण जातीपातीमध्ये गुंतून पडणार असू तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व आपण घेऊन बसणार. हिंदू हा हिंदू मुस्लीम दंगलीत फक्त हिंदू असतो. तो २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला भारतीय होतो. चीननं आक्रमण केल्यावर त्याला आपण कोण कळतच नाही. मग ज्यावेळी त्याला कळतच नाही तेव्हा तो मराठी, गुजराती, तामिळ असा होतो. मग तो ज्यावेळी तो मराठी होतो, त्यावेळी तो मराठा, ब्राह्मण, आग्री असा होतो. राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे.”
‘शरद पवारांना हवं जातीपातीचं राजकारण’
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला,” असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
जातिभेदात खितपत पडला महाराष्ट्र
राज पुढे म्हणाले की, छत्रपतींवरील पुस्तक बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिले, ते ब्राह्मण! मग त्यांनी चुकीचे लिहिले असणार!! आम्ही इतिहास वाचत नाहीत, शिवाजी महाराजांना जाती-पातीची संकल्पना मान्य नव्हती. महाराष्ट्राची परंपरा वैभवशाली पण तो महाराष्ट्र जातिभेदात खितपत पडला. महाराष्ट्राची अवस्था अजून किती वाईट करायची? जेम्स लेन हा भिकारडा होता? त्याने माँसाहेब जिजाऊंबद्दल काय लिहिले माहीतच आहे,
आ्म्हीच आमची अब्रू काढतो, त्यावरून इथे राजकारण जाणूनबुजून तापवलं जातं. आपणही त्याच्यावर चर्चा करत बसतो याची लाज वाटते. आम्हाला कसलेही भान नाही. निवडणुकीत जनतेला पैसे वाटून वेडेपिसे करायचे असा प्रघात सुरू आहे. जातीपातीतून आपण बाहेर येत नाही. हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत? असा सवालही त्यांनी केला.
Raj Thackeray On Sharad Pawar Sharad Pawar wants caste politics, it started only after the birth of NCP – Raj Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray Speech : मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील, नाहीतर आम्हीही दुप्पट लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, राज ठाकरेंचा इशारा
- Raj Thackeray : मशिदी – मदरशांवर ईडीचे छापे घाला; राज ठाकरेंचे पंतप्रधानांना आवाहन!!; मशिदींवरील भोग्यांच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा!!; मनसैनिकांना आदेश
- Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मतदारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; राज ठाकरेंचा ठाकरे पवारांवर हल्लाबोल!!
- राजस्थानमधील करौली येथे जातीय दंगल हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर दगडफेक