• Download App
    बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण; गारठा, उष्मा देखील वाढला । Rainy weather in Maharashtra due to cyclone in Bay of Bengal; cold , heat also increased

    बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण; गारठा, उष्मा देखील वाढला

    वृत्तसंस्था

    मुंबई : बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी गारठा आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसा उष्मा देखील वाढला आहे. Rainy weather in Maharashtra due to cyclone in Bay of Bengal; cold , heat also increased

    बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळामुळे तेथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र आहे. महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी या चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचा अंदाज आहे. रविवारी विदर्भ, मराठवाडय़ात उन्हाचा तडाखा कायम होता. मात्र, पुढील दोन दिवसांत सर्वत्र दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.



    बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर २१ मार्चला चक्रीवादळात होणार आहे. दोन दिवस चक्रीवादळाची स्थिती कायम राहणार असून, ते अंदमान, निकोबारच्या दिशेने जाणार आहे. महाराष्ट्रातही दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊसही झाला. अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

    Rainy weather in Maharashtra due to cyclone in Bay of Bengal; cold , heat also increased

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, पण ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!

    Bihar Maha : महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; 20 महिन्यांत प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा

    Jain Muni : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात मूळ चूक ट्रस्टींकडूनच, त्यांनी पापांचे प्रायश्चित्त घ्यावे; जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांची भूमिका