• Download App
    राहुल गांधींना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना सावधगिरी बाळगण्याचे केले आवाहन । Rahul Gandhi Corona Positive appealed to test those who came in contact with him

    राहुल गांधींना कोरोनाची लागण, पंतप्रधान मोदींनी लवकर बरे होण्याची व्यक्त केली कामना!

    Rahul Gandhi Corona Positive : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी दुपारी राहुल गांधी यांनी ट्विट करून त्याविषयी माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. Rahul Gandhi Corona Positive appealed to test those who came in contact with him


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी दुपारी राहुल गांधी यांनी ट्विट करून त्याविषयी माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

    कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी दुपारी ट्वीट केले की, सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे समजले. जे कुणी त्यांच्या संपर्कात आले असतील, अशा सर्वांनी खबरदारी बाळगावी व सुरक्षित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

    दरम्यान, कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राहुल गांधी यांनी नुकताच पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींनी बंगालमध्ये केवळ दोन सभांना संबोधित केले, त्यानंतर त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.

    राहुल गांधींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी व ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

    दुसरीकडे, देशाचे माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मनमोहन सिंग यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आढळल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सच्या डॉक्टरांची टीम त्यांची देखरेख करत आहे.

    यापूर्वी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. रॉबर्ट वाड्रा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर प्रियंका गांधींनी यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आणि सर्व निवडणूक दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

    Rahul Gandhi Corona Positive appealed to test those who came in contact with him

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के