वृत्तसंस्था
पुणे : पुणे जिल्हा लसीकरणात अव्वल ठरला असून जिल्ह्याने ‘एक कोटी’ लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. ७० लाख लोकांनीनल लसीचा पहिला तर ३० लाख लोकांनी हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. Pune’s ‘one crore’ vaccination completed
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यासहित पुण्यात हाहाकार माजवला होता. या काळात जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी पावले उचलण्यात आली. दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच लसीकरणावरही मोठा भर दिला जात आहे.
पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला होता. तेव्हा खबरदारी घेऊन लसीकरणाचा वेग वाढवला. त्यानंतर जिल्हा लसीकरणात अव्वल स्थानावर राहिला आहे. आजपर्यंत एक कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. ७० लाख नागरिकांनी पहिला तर ३० लाख नागरिकानी दुसरा डोस घेतला आहे. लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचं लसीकरण होईल. विशेष म्हणजे १५ दिवसांत जिल्ह्यात ११ लाख जणांचे लसीकरण झाला आहे.
१५ दिवसांत ५ वेळा १ लाखांपेक्षा अधिक डोस
सप्टेंबरमध्ये लसीचा मोठा साठा आणि विविध कंपन्यानी केलेल्या लसीकरणामुळे मागील पंधरा दिवसांत तब्बल ५ वेळा जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाले. तर, एका दिवशी पावणेतीन लाख डोस देण्याचा विक्रम झाला होता.
Pune’s ‘one crore’ vaccination completed
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबात भारत-पाकिस्तान सीमेवर तीन दहशतवाद्यांना अटक; हँड ग्रेनेड, 11 काडतुसे आणि पिस्तूल जप्त
- राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे पटोले-थोरात फडणवीसांच्या भेटीला, सत्तेतील सहकारी राष्ट्रवादी-शिवसेना नाराज!
- सरकारने निवडणुकीची थट्टा मांडली, प्रभागरचनेचा उद्देश सांगावा, लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? नाशकात राज ठाकरेंचा हल्लाबोल
- Corona Spread : लाओसच्या गुफांमध्ये आढळली कोरोनाचा संसर्ग पसरवणारी वटवाघुळे, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
- 21 हजार कोटींचे हेरॉईन जप्त झाल्याची अंमलबजावणी संचालनालयाने घेतली दखल, मनी लाँडरिंगची करणार चौकशी