• Download App
    पुण्याचा कुख्यात गुंड मारणेचा जामीन फेटाळला ,तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी दिलासा नाहीPune's notorious hooligan bail denied, no relief in procession after release from Taloja jail

    पुण्याचा कुख्यात गुंड मारणेचा जामीन फेटाळला ,तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी दिलासा नाही

    गजा मारणेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता.परंतु त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला होता.Pune’s notorious hooligan gaja marne bail denied, no relief in procession after release from Taloja jail


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्याचा कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी गजा मारणेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर गजा मारणेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता.परंतु त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला होता.

    नक्की काय आहे प्रकरण?

    तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर तीनशे गाड्यांसह काढलेली मिरवणूक त्याच्या अंगलट आली . साताऱ्यातील जावळी तालुक्यात गजा मारणेच्या फिल्मी स्टाईलमुळे त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.



    तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेची मिरवणूक काढण्यात आली होती. त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.

    कोण आहे गजा मारणे

    गजा उर्फ गजानन मारणे हे पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात २४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

    गुंड गजाजन मारणे याच्यावर २०१४ मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजाला २०१४ पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. सात वर्षांनंतर गजा सुटका मारणेची झाली.

    Pune’s notorious hooligan gaja marne bail denied, no relief in procession after release from Taloja jail

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट