विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई मार्गावरची सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती. ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती.ती आजपासून सुरू झाली आहे.आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटीला हार घालून स्वागत केले. आजपासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे .Punekar’s ‘favorite ‘ Sinhagad Express ran
पुण्यावरून ही रेल्वेगाडी (क्र. ०१००९) पहाटे ६ वाजून ०५ मिनिटांनी निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी पोचली.ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी (क्र. ०१०१०) सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी निघेल आणि रात्री १० वाजता पुण्यात पोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.पुणे व मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईला ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची आहे.
- पुणेकरांची ‘शान’ असलेली सिंहगड एक्स्प्रेस धावली
- तब्बल १९ महिन्यांनी पुन्हा प्रवास सुरु झाला
- स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटीला हार घातला
- पहाटे ६ वाजून ०५ मिनिटांनी पुण्यातून रवाना
- मुंबईला सकाळी ९ नंतर पोचली
- पुण्या- मुंबईतील कर्मचाऱ्यांचीची मोठी सोय
Punekar’s ‘favorite ‘ Sinhagad Express ran