डिसेंबर महिन्याचे वेतन न मिळाल्याने क’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची, तसेच वेतनावर घर तसेच इतर कारणांसाठी कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. Pune: Salary of 18,000 employees of NMC stagnated; Assign 20 additional staff to prepare pay bills
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांचे डिसेंबरचे वेतन झालेले नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांमधे नाराजी पसरली आहे.सरकारने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलं आहे.दरम्यान या वेतन वाढीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या बिलांमध्ये संगणकीय बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे.
डिसेंबर महिन्याचे वेतन न मिळाल्याने क’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची, तसेच वेतनावर घर तसेच इतर कारणांसाठी कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत न झाल्याने कर्जाचे हप्ते भरता आलेले नाहीत.घर खर्च करण्यास आर्थिक चणचण निर्माण होत आहे.त्यामुळे तातडीने वेतन करण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत होती.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने ज्या कर्मचाऱ्यांची वेतन बिले तयार आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीनं देण्याचे आदेश लेखापाल विभागास दिले आहेत.तसेच उरलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले तयार करण्यासाठी २० अतिरिक्त कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.