वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात लसीकरणाला आणखी गती देण्यासाठी 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण लसीकरण केंद्राची संख्या 200 च्या आसपास वाढणार आहेत. Pune Municipal increase 86 corona vaccination center.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. पुण्यातील लसीकरणासाठी आणखी 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण लसीकरण केंद्राची संख्या 200 च्या आसपास वाढणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे दुप्पट उद्दीष्ट ठेवले आहे. लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले. यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली होती.
सध्या 109 केंद्रांवर कोरोना लसीकरण
पुणे जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचा संकल्प पुणे विभागाने केला. या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने 86 केंद्रांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. या सर्व लसीकरण केंद्रांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुण्यात 86 केंद्र वाढवली जाणार आहेत.
पुण्यात 109 केंद्रांवर कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आणखी 86 केंद्रांची भर पडणार आहे.
डॉ. आशिष भारती, महापालिकेचे आरोग्यप्रमुख
Pune Municipal increase 86 corona vaccination center.
इतर बातम्या वाचा…
- कोरोनावरील लशींच्या बाबतीत भारत जगात भाग्यवान देश, जागतिक बॅंकेचे प्रशस्तीपत्रक
- शेतकऱ्याचा मुलगा, पत्रकार ते भारताचे सरन्यायाधीश, जाणून घ्या न्या. रमणांचा नेत्रदीपक प्रवास
- सुपरस्टार विजय मतदानाला आला चक्क सायकलवरून, फोटोसाठी चाहत्यांकडून पाठलाग
- इस्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांचे नशीब बलवत्तर, बहुमताअभावी सत्तास्थापनेची मिळाली पुन्हा संधी
- योगी आदित्यनाथ सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका, १२० पैकी ९४ एनएसएची प्रकरणे ठरवली रद्दबातल