विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाच्या नियमावलीचा उत्पन्नवाढीसाठी वापर करण्याचा डाव पुणे महापालिकेने आखला आहे. नियम तोडणाऱ्यांकडून दिवसाला 10 लाख रुपये वसूल कराच असा आदेश काढला आहे.सार्वजनिक ठिकाणांवर विना मास्क फिरणाऱ्या सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या लोकांकडून दंड वसुली करण्याचा हा आदेश आहे.Pune Municipal Corporation’s order, recover Rs 10 lakh a day from corona violators
दिवसाला थोडाथोडका नव्हे तर तब्बल दहा लाख रुपये दंड पुणेकरांकडून वसूल करण्याचे आदेश महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेले आहे. या आदेशावरून उपायुक्त माधव जगताप यांच्यावर नागरिक सडकून टीका करू लागले आहे. हा निर्णय तालिबानी आणि तुघलकी प्रवृत्तीचा निदर्शक असल्याची टीका देखील व्यापारी महासंघाकडून केली जाऊ लागली आहे. व्यापाऱ्यांनी हा आदेश तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई वाढवावा असे आदेश जगताप यांनी दिले आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना याबाबत लेखी आदेश देण्यात आले आहे नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि पालिका क्षेत्रातून दहा लाख रुपयांचा दंड दररोज वसूल करण्यात यावा, या वसुलीचा दैनंदिन अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या व्हाट्सअप ग्रुपवर न चुकता पाठविण्यात यावा असे देखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास किंवा अहवाल सादर न केल्यास कारवाई करण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे. दरम्यान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हा आदेश तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त माधव जगताप यांना हा आदेश ताबडतोब रद्द करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत़. तसेच मास्क न लावणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे आदी कारणातून दिवसाला दहा लाख रूपये दंड वसुलीचे उद्दिष्ट कशाच्या आधारे दिले, याचा खुलासाही त्यांच्याकडून मागविण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
Pune Municipal Corporation’s order, recover Rs 10 lakh a day from corona violators
महत्त्वाच्या बातम्या
- तामिळनाडू विधानसभेत कृषी कायद्यांविरुद्ध प्रस्ताव पारित, शेतकऱ्यांविरुद्ध नोंदवलेले सर्व गुन्हे परत घेणार, मुख्यमंत्री स्टालिन यांची घोषणा
- Coal Scam Case : कोळसा घोटाळ्यात तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला ED ने बजावले समन्स
- अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू, परिणामाची चर्चा कधी करत नाही, नाशकात संजय राऊतांचा राणेंवर निशाणा
- झटपट श्रीमंत बनण्याच्या नादात तरुणांचे कृत्य, 78 एसी चोरून भाजीपाल्यासारखे रस्त्यावर विकले, पाच जणांना अटक
ReplyReply allForward
|