विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील मार्केट यार्ड उद्या (११ ऑक्टोबर) म्हणजेच सोमवारी बंद राहणार आहे. लखिमपुर खेरी येथे झालेल्या शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीने या घटनेच्या निषधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला आहे. त्याचप्रमाणे पुणे अग्रिकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी (APMC) बंद राहणार असल्याचे ट्रेडर्स युनियनने जाहीर केले आहे.
Pune market yard to remain shut on Monday
Essential services to remain unaffected
शनिवारी छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनने भाजीपाला आणि फळ बाजार सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ट्रेडर्स युनियनने आपल्या सर्व सदस्यांना हा बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे शेती उत्पादन बाजारामध्ये आणू नये असे आव्हान त्यांनी केले.
आज रात्री बारा वाजल्यापासून हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीने सांगितले. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा, जसे मेडिकल फॅसिलिटीज, दवाखाने, दूध आणि व्हेजीटेबल सप्लाय यांच्यावर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.
Pune market yard to remain shut on Monday
Essential services to remain unaffected
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल