पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सगळ्याच मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याला एकमताने मान्यता दिली. Pune: Due to Corona, Ganeshotsav in Pune is simple again
यंदाचा गणेशोत्सव कसा असावा, या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गणेशोत्सव मंडळे, पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यात हा निर्णय एकमताने घेतला गेलाय.
सलग दुसऱ्या वर्षी पुण्यात गणेशोत्सव साधेपणाने होणार आहे. गणेशोत्सव मंडळानाही परवाने मिळवण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी ऑनलाईन परवाने दिले जाणार आहेत.
मुरलीधर मोहोळ
महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातर्फे आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हे सांगण्यात आलं की यंदाही कोरोनाचं संकट संपलेलं नाही त्यामुळे उत्सव साधेपणाने साजरा करावा. मंडप, स्पीकर यासाठी 2019 ची संमती ग्राह्य धरली जाईल. त्यासाठी मंडळांना पोलीस स्टेशन किंवा महापालिकेत यावं लागणार नाही. कोरोनाचे नियम पाळून गणेश दर्शन, कार्यक्रम, ऑनलाईन दर्शन या सगळ्याला संमती देण्यात आली आहे. पुण्यातल्या मंडळांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे यात काहीही शंका नाही. पुण्यातल्या उत्सवाला १२५ वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा आहे तरीही कोरोनाचं संकट आणि तिसऱ्या लाटेची भीती पाहता सगळ्या मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्यास संमती दर्शवली आहे. येणारा गणेशोत्सव हा साधेपणाने, निर्विघ्नपणे आणि योग्य ती सगळी काळजी घेऊन साजरा केला जाईल.
कसबा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे
गेल्या वर्षी जशी कोरोनाची स्थिती होती तशीच या वर्षीही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिक, गणेश मंडळं या सगळ्यांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पद्धतीनेच हा उत्सव यंदाही साधेपणाने साजरा केला जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळावं, ऑनलाईन गणेशोत्सव साजरा केला तर त्याला प्राधान्य असेल. तसंच घरगुती गणेशोत्सव साजरा करतानाही पुणेकरांनी घरच्या गणपतीचं विसर्जन घरीच करायला हवं. तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो आहे मात्र आपण नियम पाळले ती तर पुण्याला स्पर्श करणार नाही असं आवाहन श्रीकांत शेटे यांनी केलं आहे.
Pune: Due to Corona, Ganeshotsav in Pune is simple again
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ला, पाश्चात्य गुप्तचर संस्थांकडून इशारा मिळूनही मनमोहन सिंग सरकारने दखल घेतली नाही, द स्पाय स्टोरीज पुस्तकात गौप्यस्फोट
- तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे झाले दोन तुकडे, २१ कमर्चारी मात्र वाचले
- माकप खासदाराने गळा आवळल्याने श्वास गुदमरला, राज्यसभेतील मार्शलांचा आरोप, अनिल देसाई यांनीही कडे तोडण्याचा केला प्रयत्न
- आंतरराष्ट्रीय पातळीवर असाही मोदीद्वेष, आक्रस्ताळ्या ममता बॅनर्जींना आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी आमंत्रण