या योजनेत भोजन भत्ता, निवास भत्ता, इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते. Pune: Deadline extended till February 28 for eligible students to apply for Swadhar Yojana benefits
विशेष प्रतिनिधी
पुणे : समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्वाधार योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. प्रसिद्धिपत्रकाद्वारे त्यांनी सांगितलं की , करोना महामारीमुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या शैक्षणिक कालावधीमध्ये स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येईल.
- ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थीनीचा छळ, कंटाळून विष प्राशन करून केली आत्महत्या
अनुसूचित जाती,नवबौद्ध घटकातील अकरावी, १० आणि १२ नंतरच्या व्यावसायिक, बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या,तसेच मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढी शिक्षण घेण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते.दरम्यान या योजनेत भोजन भत्ता, निवास भत्ता, इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते.
परंतु २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये शैक्षणिक संस्था, महाविद्यालये प्रत्यक्ष बंद होती.
म्हणून या संबंधित विद्यार्थ्यांनी भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेतल्या आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी खोली भाड्याने घेऊन ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण घेतले असेल अशा पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.या अर्जाची तारीख २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.