• Download App
    पुण्यातील उद्योजकाचे प्रयत्न आणि पंतप्रधान मोदींची साथ, सिंगापूरहून साडेतीन हजार व्हेंटिलेटर करणार एअर लिफ्ट|Pune-based entrepreneur's efforts and PM Modi's support, three and a half thousand ventilators will be airlifted from Singapore

    पुण्यातील उद्योजकाचे प्रयत्न आणि पंतप्रधान मोदींची साथ, सिंगापूरहून साडेतीन हजार व्हेंटिलेटर करणार एअर लिफ्ट

    भारतीय जनता पक्ष आणि पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांच्या सहकायार्ने आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटीलेटर एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टी भारतात आणण्यासाठी परवानगी दिली आहे.Pune-based entrepreneur’s efforts and PM Modi’s support, three and a half thousand ventilators will be airlifted from Singapore


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : भारतीय जनता पक्ष आणि पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांच्या सहकार्याने आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटीलेटर एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टी भारतात आणण्यासाठी परवानगी दिली आहे.पाटील म्हणाले, सुधीर मेहता हे जिल्ह्यामधील आरोग्य व्यवस्था अपग्रेट करण्यासाठी इतर व्यवसायिकांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत.



    त्यांनी मागील वर्षभरामध्ये जवळजवळ २०० कोटी उभे केलेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मला सांगितलं की सिंगापूरमध्ये काही आरोग्य विषय साहित्य उपलब्ध आहे. यामध्ये त्यांना ८००० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटीलेटर असल्याचं सांगितलं. सिंगापूर सरकारचा एक कॉर्पोस फंड आहे.

    जो जगातील सर्वात मोठ्या चॅरीटी फंडपैकी एक आहे. याअंतर्गत सिंगापूर सरकारने मेहतांना आॅफर दिली की ५० टक्के रकमेमध्ये आम्ही तुम्हाला हे देतो. न्यायची व्यवस्था करा.पाटील म्हणाले, माझ्याकडे हा विषय आला.

    मी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. केंद्र सरकारने विमानाने या गोष्टी आणण्याची तयारी दर्शवली आहे. मोदी आणि एअर इंडियाच्या प्रमुखांचं बोलणं झालं आहे. एअर इंडियाच्या माध्यमातून या गोष्टी एअरलिफ्ट केल्या जाणार आहेत. मेहता हे इथल्या उद्योजकांच्या माध्यमातून पैसे उभे करतायत.

    त्यामधून अगाऊ रक्कम दिली जाईल. मग हे भारतात आल्यानंतर त्याचं वितरण होईल. सर्व साहित्य भारतात आल्यानंतर ४००० हजार कॉन्सन्ट्रेटर्स भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील भाजपा अध्यक्षाच्या माध्यमातून दहा याप्रमाणे वितरित करायचे आणि त्याची बँक निर्माण करायची आहे.

    Pune-based entrepreneur’s efforts and PM Modi’s support, three and a half thousand ventilators will be airlifted from Singapore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस