• Download App
    Pune: Action on 203 bullet riders in two days; Remove the loud silencer taken

    पुणे : दोन दिवसांत २०३ बुलेटस्वारांवर कारवाई ; मोठ्या आवाजाचे सायलेन्सर घेतले काढून

     

    १८ ऑक्‍टोबर २०२० पासून बुलेटचा सायलेन्सर बदलणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली. जानेवारी २०२१ पर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. Pune: Action on 203 bullet riders in two days; Remove the loud silencer taken


    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : बुधवारपासून वाहतूक पोलिसांनी बुलेटला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवल्यामुळे बुलेटस्वारांवर पुन्हा कारवाईला सुरुवात केली. दोन दिवसांत 203 बुलेटस्वारांना दंड करून त्यांचे मोठ्या आवाजाचे सायलेन्सरही काढून घेतले.एवढेच नव्हे तर जवळचा मॅकॅनिक बोलवून मोठ्या आवाजाचा सायलेन्सरही काढून घेतला. आरटीओच्या नियमानुसार वाहनांमध्ये सर्वसामान्यांना कोणताही बदल करता येत नाही.

    तरीदेखील काही बुलेटस्वार बुलेटचा मूळ सायलेन्सर काढून त्याजागी मोठ्या आवाजाचा सायलेन्सर बसवतात. तर काहीजण मोठ्या फटाक्‍यासारखा मध्येच आवाज येईल, सायलेन्सर बसवतात. अचानक वाजलेल्या अशा आवाजामुळे शेजारील वाहन चालक बिचकतात.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच प्रदुषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होते.
    १८ ऑक्‍टोबर २०२० पासून बुलेटचा सायलेन्सर बदलणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली.

    जानेवारी २०२१ पर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे बुलेटचा सायलेन्सर बदलणाऱ्यांना चांगलाच चाप बसला होता. मात्र त्यानंतर कारवाईमध्ये शिथिलता आल्यानंतर काही बुलेटस्वारांनी पुन्हा मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविले.अशा बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. गेल्या दोन दिवसांमध्ये २०३ बुलेटस्वारांवर कारवाई केली.

    Pune: Action on 203 bullet riders in two days; Remove the loud silencer taken

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!