प्रतिनिधी
बीड : भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कोरोना काळात महाराष्ट्रात झालेल्या कामाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारचे कौतुक केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. प्रत्यक्षात त्यांचा “बाईट” पाहिल्या आणि ऐकल्यानंतर प्रीतम मुंडे यांनी आधी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे आणि नंतर राज्य सरकारचे आणि राजेश टोपे यांचे कौतुक केल्याचे स्पष्ट होत आहे. Pritam Munde praises the Central Government as well as the State Government
कोरोना कालावधीत केंद्र सरकारने विविध योजना राबवून संपूर्ण देशात आरोग्य व्यवस्था सुधारली आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली, तसेच राजेश टोपे यांनीही कौतुकास्पद काम केले. राज्य सरकारने ही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार आहेत त्यांची काळजी दोन्ही सरकारांनी घेतली, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या. राजकीय व्यासपीठावरून सर्व पक्ष एकमेकांवर टीका करत असले तरी आरोग्य या विषयावर अशी टीका होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
परंतु मराठी माध्यमांनी मात्र “सिलेक्टीव्ह” होत ठेवत प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारचे कौतुक केल्याच्या बातम्या दिल्या आहेत.
त्याच वेळी प्रीतम मुंडे यांनी यांना भोंग्यांच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी दोन धर्मात तेढ निर्माण होणे बरोबर नाही. हा अचानक हा विषय कसा पुढे आला याविषयी त्यांनी शंका व्यक्त केली. त्याच वेळी प्रत्येक राजकीय पक्षाला भोंग्यांचा विषय कधी ना कधीतरी ॲड्रेस करावाच लागेल, असे त्या म्हणाल्या. परंतु प्रीतम मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याच्या बातम्या त्यांच्या या वक्तव्यावरून मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
Pritam Munde praises the Central Government as well as the State Government
महत्त्वाच्या बातम्या
- अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत ३३ हजार ७९५ लोकांनी नोंदणी : श्री अमरनाथ श्राइन बोर्डची माहिती
- कार अपघातामध्ये चालकाचा मृत्यू
- Sri Lanka Crisis : आयएमएफसोबतच्या कराराला 4 महिने लागतील, तोपर्यंत भारताला अधिक आर्थिक मदतीची मागणी
- Akshay Kumar : पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादात, सेन्सॉर बोर्डाच्या माजी प्रमुखांनी केली टीका