विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना काळात मुंबई व महाराष्ट्रातून जीवाच्या धास्तीने पलायन केलेल्या परप्रांतीयांमुळेच देशभरात कोरोना पसरला, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेले विधान अगदी हास्यास्पद असून स्वतःच्या अपयशाचे खापर काँग्रेस पक्षावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. Prime Minister Modi’s criticism of Congress out of sheer desperationDr. Criticism of Nitin Raut
कोणतेही पूर्वनियोजन न करता पुरेसा वेळ न देता मोदींनी टाळेबंदी लागू केल्याने देशातील कोट्यवधी लोकांवर विशेषत: मजुरांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली. हे आपले अपयश लपविण्यासाठी मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करण्याची पळवाट शोधली आहे,अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसवर खापर फोडण्याचा खालच्या पातळीवरील राजकारण करण्यापेक्षा मोदींनी देशातील मजुरांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसने मजुरांची काळजी घेतली म्हणून मोदींच्या पोटात दुखत असेल,त्यांचे अपयश चव्हाट्यावर आणले असे वाटत असेल तर हे त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे,असा टोलाही डॉ. राऊत यांनी लगावला.
रोजीरोटी कमविण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातून मुंबईत येणाऱ्या भारतीयांना सांभाळण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. काँग्रेसने कधीही परप्रांतीयांना हुसकावून लावले नाही. कोरोना काळात जीवाच्या भीतीने मिळेल त्या वाहनांनी आणि पायी प्रवास करणाऱ्या
या लोकांना त्यांच्या गावी पोहचण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन मदत केली. महाराष्ट्र सरकारने तर विशेष रेल्वेगाड्यांची सोय करून त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठविले. मात्र, काँग्रेस पक्षाला नेहमीच पाण्यात पाहणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळातील स्वतःचे अपयश लपविण्यासाठीच संसदेत अशा पद्धतीचे बेजबाबदार विधान केले असल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला.
उत्तर प्रदेशासह चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकत चालली असल्याने पंतप्रधान मोदी धास्तावले आहेत. त्यामुळे निव्वळ हताशेपोटी त्यांनी देशात कोरोना संसर्ग पसरण्यामागे मुंबई, महाराष्ट्रातून पलायन केलेल्या परप्रांतीयांना जबाबदार धरले असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र आणि काँग्रेसने मजुरांची काळजी घेतल्यानेच हे मजूर कोरोनानंतर महाराष्ट्रात परतले,याकडेही डॉ. राऊत यांनी लक्ष वेधले.
Prime Minister Modi’s criticism of Congress out of sheer desperationDr. Criticism of Nitin Raut
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
- अल्पसंख्यांकांचे जीवनमान उंचावण्यसाठी पंतप्रधान मोदींचा पंधरा कलमी कार्यक्रम
- उत्तर प्रदेशातील राजकारणात उल्टापुल्टा, ज्यांना खासदारकीला पाडले त्यांच्याच पत्नीला समाजवादी पक्षाने दिली उमेदवारी
- केएफसीही भंजाळली, ह्युंदाईपाठोपाठ केले काश्मीरबाबत पाकिस्तानच्या समर्थनार्थ ट्विट