विशेष प्रतिनिधी
पुणे : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केला होता. मागील बऱ्याच दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना निशाणा साधून मोठेमोठे आरोप केले होते. अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्यांची देखील जोरदार चर्चा झाली होती. आता अजित पवार यांनी मौन सोडले असून आज पुण्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
Presenting a list of 64 sugar factories, Ajit Pawar remained silent on the issue of Jarandeshwar Sugar Factory
या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी एकूण 64 सहकारी साखर कारखाने आणि एक सूतगिरणी अशा एकूण 65 साखर कारखान्यांच्या व्यवहारांची यादी वाचून दाखवली. गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व कारखान्यांचे व्यवहार झाले आहेत आणि नेमक्या कोणत्या किमतीला कोणता कारखाना विकला गेला आहे. याची सर्व माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आहे. मातीमोल किमतीमध्ये कारखाने विकले गेले या विरोधकांच्या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
जरंडेश्वर प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, या प्रकरणाला 12 ते 15 वर्षे निघून गेली आहेत म्हणून मी आजवर काहीही बोललो नव्हतो. पण 25 हजार कोटी आणि 10 हजार कोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतर आज ही पत्रकार परिषद घेऊन मी उत्तर द्यायचे ठरवले आहे. मागे सरकारने सीआयडीची चौकशी केली. एसीबीने, इओडब्ल्यू, सरकारी विभागाचे न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या माध्यमांतून चौकशी केली. पण कोणताही गैरप्रकार त्यावेळी आढळला नव्हता असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
राज्य सहकारी बँकेने 30 कारखाने विकले आहेत. तर 6 कारखाने जिल्हा बँकेने विकले आहेत. शासन मान्यतेने विक्री केलेल्या 6 कारखान्यांमध्ये 2003 साली शेतकरी सहकारी कारखाना 30 कोटी 56 लाखांना विकला गेला होता. ह्या व्यवहाराबाबत कोणी का बोलत नाही? असा प्रश्न त्यांनी ह्यावेळी विचारला आणि आपली नाराजीही व्यक्त केली होती.
Presenting a list of 64 sugar factories, Ajit Pawar remained silent on the issue of Jarandeshwar Sugar Factory
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा बाप काढला; अजितदादा म्हणाले “नो कॉमेंट्स”
- चिथावणीखोर भाषणे; जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला
- महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
- ‘लसीकरण मोहिमेवर व्हीआयपी संस्कृतीचा दबदबा नव्हता’, पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील टॉप 10 मुद्दे
- पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
- ‘जनतेसोबत घृणास्पद विनोद सुरू आहे’, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल