• Download App
    प्रताप सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांवरील राग जाईना, म्हणाले केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझा बळी|Pratap Sarnaik saying he is victim in the quarrel between the Center and the state

    प्रताप सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांवरील राग जाईना, म्हणाले केंद्र आणि राज्याच्या भांडणात माझा बळी

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : शिवसेनेने भारतीय जनतासोबत फारकत घेतल्यानेच आपल्यावर चौकशी लागल्याचे आमदार प्रताप सरनाईक म्हणत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरील राग अजून गेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात माझ्यासारख्या आमदाराचा बळी जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.Pratap Sarnaik saying he is victim in the quarrel between the Center and the state

    सरनाईक म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्र हे संस्कृतीप्रिय राज्य होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षांत खूप बदल झाला आहे. त्यामुळे तरुण पिढी राजकारणात यायचे की नाही, याबाबत विचार करताना दिसत आहे. महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्यासाठी किंबहुना ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.



    शिवसेनेच्या भूमिकेबाबत नाराज आहात का, असे त्यांना विचारले असता, तसे काहीही नसल्याचे त्यांनी सांगितले. तसे असते तर माज्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आले असते का, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला. मात्र, मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत छेडले असता, त्याला वेळ झाला असल्याचे सांगत आता आपले विचार बदलले असल्याचेही ते म्हणाले.

    Pratap Sarnaik saying he is victim in the quarrel between the Center and the state

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस