मुंबईत गेल्या वर्षी २२ ऑक्टोबर २०२० रोजी अनेक भागांत आठ ते दहा तास खंडीत झाला होता. देशाच्या आर्थिक राजधानीत वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सायबर हल्ला झाल्याचे ठोकून दिले होते. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर त्यामागे चीनचा हात असल्याचे म्हटले होते. त्यांचा खोटारडेपणा महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानेच उघडकीस आणला आहे. कोणत्याही प्रकारे सायबर हल्ला झालेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.Power outage in Mumbai: Power Minister Nitin Raut and former Home Minister Anil Deshmukh exposed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत गेल्या वर्षी २२ ऑ क्टोबर २०२० रोजी अनेक भागांत आठ ते दहा तास खंडीत झाला होता. देशाच्या आर्थिक राजधानीत वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सायबर हल्ला झाल्याचे ठोकून दिले होते. त्यांचा खोटारडेपणा महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानेच उघडकीस आणला आहे. कोणत्याही प्रकारे सायबर हल्ला झालेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
22 ऑक्टोबर रोजी मुंबईसारखा कधीही वीज पुरवठा खंडित न होणाºया महानगरीत एक-दोन नव्हे तर काही भागात आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडित झाला होता.
मुंबईतील वीज गायब प्रकरणाबाबत शासनाने सारवासारव करताना हा सायबर हल्ला आहे असे सांगितले होते आणि तसा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवलेला होता. आता मात्र महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने या प्रकारासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल पुढे आलेला आहे. या अहवालात हा सायबर हल्ला नाही असे स्पष्ट म्हटलेले आहे.
सभागृहात खोटा अहवाल ठेवणाऱ्या ऊजार्मंत्री आणि त्यांना मदत करणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहाची माफी मागावी आणि नवीन अहवाल पटलावर ठेवावा अशी मागणी माजी उर्जामंत्री चंद्रशेख बावनकुळे यांनी केली आहे. पावर ग्रिड चार दिवस बंद पडलेला असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्यातून हा प्रकार घडलेला आहे. ऊर्जा मंत्री आणि गृहमंत्री यांचे अज्ञान आता उघडे पडलेले आहे.
त्यांनी आमची चूक झाली असे मान्य करायला हवे होते. आमच्यामुळे मुंबई अंधारात गेली हे मान्य केले असते तर ही वेळ आली नसती. आता मात्र खोटा अहवाल मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर येणार आहे. याप्रकरणात सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव आणला जाऊ शकतो असंही माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे.
मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाल्यावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीनेही सायबर हल्याची शक्यता व्यक्त केली होती.
मुंबईमध्ये 12 ऑक्टोबरला झालेल्या पॉवर कटमागे चिनी हॅकर्सचा हात असल्याची शक्यता केंद्र सरकारनं फेटाळून लावली. पण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र यामगे विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखही याबाबत पत्रकार परिषदेत चक्क खोटे बोलले होते. वीज खंडीत झाल्यामागे सायबर हल्ला झाला असल्याची शक्यता पुढे आली आहे. 14 ट्रोजन हॉर्सेस मालवेअर सर्व्हरमध्ये टाकण्याचा प्रयत्न झालेला असू शकतो असा अहवाल आल्याचे त्यांनी म्हटले होते.
यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉल स्ट्रिट जर्नलमध्ये छापून आलेल्या वृत्ताचाही संदर्भ दिला होता. चीन आणि इतर काही देशांकडून झालेल्या सायबर हल्ला असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते की, न्यूयॉर्क टाईम्सला बातमी आली आहे.
अमेरिकेच्या रेकॉर्डेड फ्यूचर्स कंपनीनेही रिपोर्ट जाहीर केला. त्यात त्यांनी शक्यता वर्तवली आहे. मुंबईच्या इलेक्ट्रीकल सप्लायर्समध्ये मालवेअर टाकण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता आहे.
आठ जीबी डाटा फॉरेन अनकाऊंडेटमधून ट्रान्सफर झालेला असू शकतो. सर्व्हरमध्ये लॉग इन अटेम्ट्प झाल्याची शक्यता आहे. सायबर सॅबॉटाजची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
Power outage in Mumbai: Power Minister Nitin Raut and former Home Minister Anil Deshmukh exposed
महत्त्वाच्या बातम्या
- चार मुस्लीमांच्या अपघाती मृत्यूनंतर कॅनडात चर्चा ‘इस्लामोफोबिया’ची
- व्वा ! उद्धव सरकार आडवी बाटली उभी करुन दाखवलीच
- पाकिस्तान, इराणशी फटकून असणाऱ्या तालिबान्यांसोबत भारताचा ‘धूर्त’ संवाद
- राज्यांनी घातलेल्या गोंधळानंतर मोदींनी नोंदवली 44 कोटी लसींची मागणी
- दहा चपात्या, डाळ-भाताने भागेना पहिलवान सुशील कुमारची भूक