• Download App
    मुख्यमंत्र्यांवर केलेले आक्षेपार्ह वक्तव्य नारायण राणेंना , पडले महागात , दादरमध्ये लागले 'कोंबडी चोर'चे पोस्टर |Poster of  Narayan Rane 'Chicken Thief' in Dadar

    मुख्यमंत्र्यांवर केलेले आक्षेपार्ह वक्तव्य नारायण राणेंना , पडले महागात , दादरमध्ये लागले ‘कोंबडी चोर’चे पोस्टर 

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं राज्यातील वातावरण  चांगलच तापले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवसैनिकांनीही  राणेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील दादर टीटी भागात राणेंचे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर ‘कोंबडी चोर’ असं लिहण्यात आलयं.Poster of  Narayan Rane ‘Chicken Thief’ in Dadar

    नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात आज मध्यरात्री दादरमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली.  हे पोस्टर शिवसेनेचे नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात लावलं आहे. या पोस्टरवर ‘कोंबडी चोर’ असं लिहिलेलं आहे.परंतु पोलिसांनी अवघ्या एका तासात हे पोस्टर हटवले आहे. मात्र, हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.आणि राजकारण हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.



    नितेश राणेंचा शिवसैनिकांना इशारा

    नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांना राणेंच्या जुहूतील घराबाहेर जमण्यास सांगण्यात आल्याचं नितेश राणेंनी काल रात्री ट्वीट करत म्हटलं होतं. यावरुन नितेश राणेंनी सिंहाच्या गुहेमध्ये प्रवेश करण्याची हिंमत करु नका, असा इशारा दिला आहे.

    नेमकं काय म्हणाले केंद्रीय मंत्री 

    स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं.त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

    मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेखही केला.

    नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल

    मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, महाड आणि पुण्यातही नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Poster of  Narayan Rane ‘Chicken Thief’ in Dadar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस