पुणे : पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीच्या बैठकीत पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिध्दीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. PMRDA development plan draft approved: Deputy Chief Minister Pawar; Pune’s journey towards the best metropolis begins
पुणे मेट्रोच्या ट्रायल रनचे उदघाटन प्रसंगी ते शुक्रवारी बोलत होते. ते म्हणाले, पीएमआरडीए विकास आराखड्याचे प्रारूप मान्य झाल्यामुळे त पुण्याची सर्वोत्तम महानगर विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.
या विकास आराखड्यात २ रिंगरोड, हायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे, १० मेट्रो मार्गिका, १३ मल्टी मॉडेल हब, ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ पर्यटन स्थळ व ३ सर्किट्स, ५ शैक्षणिक केंद्रे, २ वैद्यकीय संशोधन केंद्रे व ७ अपघात उपचार केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, १ क्रिडा विद्यापीठ, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्याने, ८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने, ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र असे महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत.
पीएमआरडीए क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र ६ हजार ९१५ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
PMRDA development plan draft approved: Deputy Chief Minister Pawar; Pune’s journey towards the best metropolis begins
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत लस दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालक अनुत्सुक
- प्रतिमा मलिन केली जात असल्याचा शिल्पा शेट्टीचा आरोप, माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव
- जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा
- आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट