• Download App
    PM SECURITY BREACH : फडणवीस म्हणतात-ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्...मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही!’PM SECURITY BREACH: Fadnavis says"Tryambakam yajamahe sugandhin pushtivardhanam ... no one can push even Modi's hair!"

    PM SECURITY BREACH : फडणवीस म्हणतात-ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्…मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही!’

    पंतप्रधानां वरील हल्ला हा देशावरील हल्ला असतो.दरम्यान काँग्रेस नेते ज्या बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत, ती निर्लज्जता आहे.PM SECURITY BREACH: Fadnavis says”Tryambakam yajamahe sugandhin pushtivardhanam … no one can push even Modi’s hair!”


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींसोबत पंजाबमध्ये जे घडलं त्यावरुन त्यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांची वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.तसेच पंजाब मधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. असा आरोप फडणवीसांनी केला.

    पंतप्रधानांवरील हल्ला हा देशावरील हल्ला

    पुढे फडणवीस म्हणाले की , पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरीनंदर सिंग यांनी सांगितलं की जिथे पंतप्रधानांचा ताफा जवळपास १५-२० मिनिटे उड्डाण पूलावर अडवण्यात आला तिथून पाकिस्तानची सीमा 10 किलोमीटर अंतरावरच होती.मग आमची राष्ट्रपतींना विनंती आहे, याची दखल देशपातळीवर घेतली जावी.



    तसेच पंतप्रधानां वरील हल्ला हा देशावरील हल्ला असतो.दरम्यान काँग्रेस नेते ज्या बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत, ती निर्लज्जता आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन मोदी आले आहेत. या आशीर्वादामुळे मोदींच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.

    ती वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

    पुढे फडणवीस म्हणाले की , पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना या देशातील जनता कधीच माफ करणार नाही. एवढी मोठी घटना घडूनही त्या राज्याचे मुख्यमंत्री फोन उचलत नाहीत, याची जेवढी निंदा केली जावी, तेवढी कमीच असेल.काँग्रेसचं हे घाणेरडं राजकारण आता जनतेपासून लपून राहिलेलं नाही.

    तसेच काँग्रेसचे नेते जी वक्तव्य आता करत आहेत, ती म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.कारण पंजाबमध्ये कॉंग्रेस जो खेळ करू इच्छित आहे, तसाच खेळ याआधी 80 च्या दशकात देखील कॉंग्रेसने केला होता. त्यामुळे याचे गंभीर परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी
    म्हटलंय.

    PM SECURITY BREACH: Fadnavis says”Tryambakam yajamahe sugandhin pushtivardhanam … no one can push even Modi’s hair!”

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस