• Download App
    पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा । Permission for Diwali Pahat events in Pune; Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement

    पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. Permission for Diwali Pahat events in Pune; Deputy Chief Minister Ajit Pawar’s big announcement

    गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच सण-उत्सवांवर परिणाम झाला. तसेच दरवर्षी होणारा दिवाळी पहाटचा कार्यक्रम गेल्या वर्षी झाला नव्हता. आता कोरोना नियंत्रणात येत आहे. त्यामुळे नियम शिथिल केले आहेत. महाराष्ट्रात नाट्यगृह आणि सिनेमागृहांना ५० टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना परवानगी आहे. त्यापाठोपाठ दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या बाबतीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.



    राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीच्या आढावा बैठकी घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. देश पातळीवर १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात १० कोटींहून जास्त तर पुण्यात १ कोटी १७ लाखांहून जास्त लसीकरण झाल्याचं त्यांनी सांगितले.

    कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात

    दरम्यान, पुण्यात करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमांवर घातलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कार्यक्रमा संदर्भातली नियमावली सविस्तरपणे स्पष्ट केली जाईल. सभागृह किंवा खुल्या मैदानातील कार्यक्रमांचे नियम या दिवाळी पहाट कार्यक्रमांना लागू असण्याची शक्यता आहे. थिएटर्स, नाट्यगृह सुरू केली आहेत. सध्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. दिवाळीनंतर अंदाज घेऊन १०० टक्के उपस्थितीची देखील परवानगी दिली जाऊ शकते, असे देखील त्यांनी सांगितले.

    Permission for Diwali Pahat events in Pune; Deputy Chief Minister Ajit Pawar’s big announcement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !