मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संपर्क साधून सहकार्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही मनसेन कोरोनासाठीच्या निर्बंधावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 1897 साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँडने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. People are getting the same experience as Rand committed atrocities in 1897, criticizes MNS Chief Minister Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संपर्क साधून सहकार्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही मनसेसेन कोरोनासाठीच्या निर्बंधावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 1897 साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँडने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. यानंतर लॉकडाऊनचा विरोधकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. मनसेसह भाजपनेही लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहालाय मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी जनतेला लॉकडाऊनचा इशारा दिला होता.
‘कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करतही आहोत. परंतु रुग्ण वाढ पाहता आरोग्य सुविधा कमी पडतील की काय, अशी स्थिती आहे. आपण लॉकडाऊन टाळू शकतो. त्यासाठी जिद्दीने आणि स्वयंशिस्तीने सर्वांनी एकत्र येत पुन्हा एकदा हातात हात घालून कोरोनाविरुद्ध लढूया. दोन दिवसांत दृश्य परिणाम दिसले नाहीत तर तज्ज्ञ व संबंधितांशी चर्चा करून पयार्यांची माहिती घेऊन कडक निर्बंध जाहीर केले जातील’ असा इशाराही त्यांनी दिला.
People are getting the same experience as Rand committed atrocities in 1897, criticizes MNS Chief Minister Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- लाजिरवाणे : राज्यात भयंकर नक्षली हल्ला होऊनही मुख्यमंत्री बघेल निवडणुकीच्या प्रचारातच मश्गुल
- ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग 22 वनडे जिंकून मोडला पुरुष संघाचा विक्रम
- महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश
- यूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेकायला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा
- निवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची