• Download App
    Maharashtra Rains : औरंगाबादेत पाझर तलाव फुटला : कन्नड-चाळीसगाव सीमेवर ढगफुटी ; दरड कोसळल्याने रस्ता बंद ; बीड जिल्ह्यातही अलर्ट । Pazhar lake erupts in Aurangabad: Cloudburst on Kannada-Chalisgaon border; Road closed due to pain collapse; Alert in Beed district too

    Maharashtra Rains : औरंगाबादेत पाझर तलाव फुटला : कन्नड-चाळीसगाव सीमेवर ढगफुटी ; दरड कोसळल्याने रस्ता बंद ; बीड जिल्ह्यातही अलर्ट

    मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. Pazhar lake erupts in Aurangabad: Cloudburst on Kannada-Chalisgaon border; Road closed due to pain collapse; Alert in Beed district too


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : हवमान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. राज्याच्या बहुतेक भागात काल रात्रीपासून संततधार ते जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. तिकडे औरंगाबादेत पाझर तलाव फुटला आहे. तर जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसाने नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे अनेक घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत. तर औरंगाबादेतही तुफान पावसाने नद्यांना पूर आला आहे.

    तीतूर डोंगरी नदीच्या उगमस्थानावरील कोदगाव आणि वलथाण ही धरणं भरली असून जोरदार पावसामुळे नदीला महापूर आला आहे. अनेक दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही पुलावरुन मोठया प्रमाणावर पाणी वाहत असल्याने चाळीसगाव शहरातून औरंगाबादकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.

    औरंगाबादमध्ये जोरदार पाऊस

    औरंगाबादमध्येही जोरदार पाऊस बरसत आहे. भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी काढले बाहेर. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार समोर आला. पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता . दरवाजा बंद झाल्यानंतर स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढले. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनीच हे रेस्क्यू ऑपरेशन राबवले.

    चाळीसगाव-कन्नड भागात ढगफुटी

    जळगावातील चाळीसगाव आणि औरंगाबादेतील कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झाली. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला. तर कन्नड चाळीसगाव घाटात कोसळली दरड. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला पूर. कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा तुटला संपर्क

    बीडला पावसाने झोडपलं

    मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला आहे. तर आंबेसावळी नदीदेखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीलादेखील पाणी आले आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.

    Pazhar lake erupts in Aurangabad: Cloudburst on Kannada-Chalisgaon border; Road closed due to pain collapse; Alert in Beed district too

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!