प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना आणि भाजपा यांच्यातले नाते कसे तोडले हे स्वतः शरद पवार यांनी कालच्या मुलाखतीत सांगितले आहे. खरे म्हणजे त्यांनी असे म्हणायला पाहिजे होते, की मीच शिवसेनेला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसायला भाग पाडले, अशा शब्दांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.Pawar should have said that I forced Shiv Sena to stab the BJP in the back; Tola of Chandrakantdada
शरद पवार यांनी काल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी सरकार कसे स्थापन झाले याचा सविस्तर तपशील सांगितला होता. शिवसेना आणि भाजप यांचा दुरावा कसा निर्माण झाला याबाबतही यांनी वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत दादा पाटील यांनी शरद पवार यांच्यावर पत्रकार परिषदेत आणि ट्विटर वर वेगवेगळी ट्विट करून निशाणा साधला आहे.
चंद्रकांतदादांची ट्विट अशी :
मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नारायण राणे यांच्याकडे एक महत्त्वाचं खातं आहे. या पदामुळे येणाऱ्या व्यस्ततेचा विचार नाही, काही महत्त्वाच्या बैठका असतील हा विचारही नाही. कामच न करणाऱ्यांना ते कसं समजणार म्हणा. पण अहंकार कुरवाळणं आता खरंच बस
मुळात मविआला कायद्याची इतकी बूज असती तर विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी कायदा धाब्यावर कशाला बसवला असता? सोयीचं तेच आपलं अशा धोरणानं कारभार चाललाय. अशा नोटिशी देऊन राणेसाहेबांना महाराष्ट्रात येणं भाग पाडलं की, तुम्ही जिंकलात? किती बालिश, किती हास्यास्पद…
मविआचं नेमकं चाललंय काय? आधी केंद्रीय मंत्री नारायण राणेजी आणि आ. नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई इतकंच काम राज्यात उरलंय? केंद्रीय मंत्री असले तरी कायद्यानुसार राणेसाहेबांना नोटिस देता येत असली, तरी ६५ वर्षांवरील व्यक्तीसाठी वेगळी तरतूद आहे, याचा सोयिस्कर विसर?
शरद पवार यांनी शिवसेनेला कसं बनवलं, हे स्वतःच सांगितलंय. ‘माझ्या एका वाक्याने भाजपा-शिवसेनेत दुरावा निर्माण झाला,’ असं ते म्हणालेत. खरं तर त्यांनी मी शिवसेनेला भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसायला कसं भाग पाडलं, असं म्हणणं अधिक संयुक्तिक झालं असतं.
Pawar should have said that I forced Shiv Sena to stab the BJP in the back; Tola of Chandrakantdada
महत्त्वाच्या बातम्या
- सिंधुदुर्ग पोलिसांनीच कायदा पाळला नाही, 65 वर्षांवरील व्यक्तीला पोलीस ठाण्यात साक्षीला बोलावताच येत नाही, फडणवीस आक्रमक
- विनामास्क कोणीही घराबाहेर पडता कामा नये ; किशोरी पेडणेकर यांचे आवाहन
- ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यात कडेकोट नाकाबंदीचे केले नियोजन
- दिलासादायक : ओमिक्रॉनवर लसी प्रभावी, जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ स्वामिनाथन यांचे लसीकरणाचे आवाहन