विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील घडामोडींवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिलव्हर ओकवर भेट घेतली. मात्र, ही खासगी भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यामध्ये मोठी राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. Pawar-Raut visit on Silver Oak; Pawar – Important discussion in Valse meeting, Mumbai Police Commissioner also present
शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडून काही प्रकरणांची माहिती घेतली. या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हेही उपस्थित होते.
शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यातील बैठकीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई, ड्रग्ज प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारणाची शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याचे समजते. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणी मागितल्याचा जो आरोप होतोय त्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने तपास सुरू केला आहे. त्याबाबतही पवार यांनी माहिती घेतल्याचे समजते.
खासदार संजय राऊत हे पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. ही एक सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावेळी राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
Pawar-Raut visit on Silver Oak ; Pawar – Important discussion in Valse meeting, Mumbai Police Commissioner also present
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल