• Download App
    डोकं फिरलंया, नानाचं डोक फिरलंया, पंतप्रधानांता ताफा अडविण्यामागे अमित शहा यांचा हात असल्याची पटोलेंना शंका|Patole suspects that Amit Shah has a hand in obstructing the Prime Minister.

    डोकं फिरलंया, नानाचं डोक फिरलंया, पंतप्रधानांचा ताफा अडविण्यामागे अमित शहा यांचा हात असल्याची पटोलेंना शंका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बेफामपणे बोलताना पंतप्रधानांचा ताफा अडविण्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे डोकं फिरलंया, नानाचं डोक फिरलंया अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.Patole suspects that Amit Shah has a hand in obstructing the Prime Minister.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील रॅली शेतकऱ्यांनी रस्ता अडविल्याने रद्द करावी लागली. पंतप्रधानांच्या ताफ्याला परत फिरावे लागले. पाकिस्तानी , खालिस्तानी समर्थक आणि काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याचा आणि देशात दंगली घडविण्याचा डाव होता, असा आरोप भाजपने केला आहे. यावर बोलताता नाना पटोले म्हणाले, एक सोडून तीन-तीन केंद्रीय गुप्ततर यंत्रणा आहेत.



    सगळ्या गोष्टींची माहिती घेतली जाते. केंद्रीय गृहखात्याच्या कंट्रोलमध्ये सगळं असतं. कालची जी घटना घडली त्यामध्ये पंजाब सरकार जबाबदार आहे, अशा पद्धतीचं भासवून पुन्हा एक नौटंकीचा आधार घेऊन पाच राज्यांमध्ये निवडणुका जिंकता येतात का, हा प्रयत्न भाजपच्यावतीने सुरु आहे. खरंतर या घटनेच्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचादेखील हात तर नाही ना? हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.

    पटोले म्हणाले, पंजाबच्या घटनेप्रकरणी देशाच्या गृहमंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे. अशाप्रकारे वागून काहीतरी डाव तर साधायचा नाहीय ना? या प्रकरणी राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावलेली आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा विश्वासघात भाजपशासित मोदी सरकारने केला.

    त्या विश्वासघाताला आता उत्तर देण्याचा निर्णय देशाच्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. देशाच्या शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी, आंदोलनजीवी अशा पद्धतीच्या उपमा देणाऱ्या पंतप्रधानांना धडा देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. हे पुसता कसं येईल त्यासाठी हा एक अयशस्वी प्रयत्न भाजपकडून सुरु झाला आहे.

    भाजप जनतेचे, शेतकऱ्यांचेच, गरिबांचे प्रश्नांकडून लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक रुप रोज बदलवतात. तशाच पद्धतीचं एक रुप निर्माण करणं, नौटंकी करण्यासारखी ही घटना होती का? असा प्रश्न आम्ही भाजपला विचारतोय , असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

    Patole suspects that Amit Shah has a hand in obstructing the Prime Minister.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!