• Download App
    परमवीर सिंग यांची नाशिकमध्ये मालमत्ता; सह आरोपी पिता-पुत्रांच्या नावाने सिन्नरमध्ये जमीन खरेदी? । Paramvir Singh's property in Nashik; Co-accused bought land in Sinnar in the name of father-son?

    परमवीर सिंग यांची नाशिकमध्ये मालमत्ता; सह आरोपी पिता-पुत्रांच्या नावाने सिन्नरमध्ये जमीन खरेदी?

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या भोवतीचा संशय वाढत चालला आहे. ते पोलिसांसमोर आणि न्यायालयासमोर चौकशी तपासासाठी हजर राहत नाहीत. Paramvir Singh’s property in Nashik; Co-accused bought land in Sinnar in the name of father-son?

    आता तर त्यांचे नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यातल्या जमीन खरेदीचे हे एक प्रकरण समोर आले आहे एका प्रकरणातील परमवीर यांचे सह आरोपी पुनुमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमवीर सिंगनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे.

    नाशकात ही मालमत्ता असून ती संजय पुनुमिया याच्या नावाने खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    संजय पुनुमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असून त्याचे परमबीर सिंह यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे याआधीच उघड झाले आहे. पुनुमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली आहे. धारणगाव, मिरगाव, पाथरे या गावांमध्ये त्याने कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे समजते. ही जमीन पुनुमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले.  परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्यामुळे पुनुमियाला हे सर्व करणे शक्य झाले. विशेष म्हणजे पुनुमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीरब सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे.

    या साऱ्या प्रकरणाची तक्रार आता सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कोठडी संपताच पुनुमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    परमवीर सिंग अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही त्यांना वारंवार समन्स पाठवून देखील ते चौकशीला आणि तपासाला हजर राहिलेले नाही न्यायालयात देखील ते हजर राहत नाहीत. त्यामुळे परमवीर सिंग यांच्या सर्व प्रकरणात भोवतीचा संशय वाढत चालला आहे.

    Paramvir Singh’s property in Nashik; Co-accused bought land in Sinnar in the name of father-son?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस