• Download App
    त्यांच्या हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा मारला; चंद्रकांत पाटील यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका । Paralyzed not only his hands but also his brain; Chandrakant Patil criticizes Thackeray-Pawar government

    त्यांच्या हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा मारला; चंद्रकांत पाटील यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बुद्धी चालत नाही, कोणतेही निर्णय सरकारकडून घेतले जात नाहीत, या सरकारमध्ये ताळमेळ नाही.त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर संपूर्ण मेंदूला लकवा मारला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत केली. Paralyzed not only his hands but also his brain; Chandrakant Patil criticizes Thackeray-Pawar government

    प्रवीण दरेकरांना सरकारने अपात्र केले आहे. त्यामुळे हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करून काहीही करू शकते. आम्ही या प्रकरणी न्यायालयात जाऊ. तेथे सरकार उत्ताणे पडणार असून थप्पड खाण्याची खूप सवय या सरकारला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.



    आधीच्या सरकारला शरद पवार म्हणत होते की, तुमच्या हाताला लकवा मारला आहे. पण मी म्हणतोय की, आता यांच्या हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा मारला आहे. यांची बुद्धीच चालत नाही. कोणतेच निर्णय घेत नाहीत.यांनी पाच आयएएस अधिकारी घालवले. या अधिकाऱ्यांना आयुष्यात चांगले काम करता आले असते, असे पाटील म्हणाले.

    Paralyzed not only his hands but also his brain; Chandrakant Patil criticizes Thackeray-Pawar government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!