• Download App
    कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर सज्ज, देवाचा पलंग निघाला; देवाचे राजोपचार बंद, २४ तास दर्शन सुरु|Pandharpur ready for Karthiki Yatra, God's bed Removed ; God's Rajopachar closed, Darshan started for 24 hours

    कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर सज्ज, देवाचा पलंग निघाला; देवाचे राजोपचार बंद, २४ तास दर्शन सुरु

    वृत्तसंस्था

    पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर सज्ज होत आहे. भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी शनिवारपासून देवाचे राजोपचार बंद करून २४ तास दर्शन व्यवस्था सुरु केली आहे.Pandharpur ready for Karthiki Yatra, God’s bed Removed ; God’s Rajopachar closed, Darshan started for 24 hours

    शनिवारी पहिल्यांदाच संध्याकाळी धुपारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढला आहे.  देवाचा पलंग निघतो म्हणजेच, देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात.जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे.



    त्यानुसार विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते,अशी प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता, मंदिरही २४ तास खुले राहायचे, मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा. यंदा कार्तिकी यात्रा होण्याची शक्यता असल्याने आजपासून २४ नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना २४ तास दर्शन मिळणार आहे.

    मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला.चोवीस तास दर्शनाला उभारून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे.  इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे ४ वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारती पर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजता मंदिर बंद होत असते.

    आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याचसाठी दर्शन बंद राहणार आहे. उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे.

    सर्वसाधारणपणे यात्राकाळात म्हणजे २४ नोव्हेंबरपर्यंत मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे.  यामुळे यात्राकाळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.

    Pandharpur ready for Karthiki Yatra, God’s bed Removed ; God’s Rajopachar closed, Darshan started for 24 hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस