• Download App
    कोरोनाच्या सावटाखाली उद्या पंढरपूर मतदारसंघात मतदान; सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तबाचा दावा; मतदानाची टक्केवारी किती राहील??|pandharpur - mangalvedha bypolls under corona threat

    कोरोनाच्या सावटाखाली उद्या पंढरपूर मतदारसंघात मतदान; सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तबाचा दावा; मतदानाची टक्केवारी किती राहील??

    प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना फैलावाच्या वाढत्या सावटाखाली उद्या पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात उद्या मतदान होते आहे. राज्यात महायुतीचा जनादेश मोडून सत्तेवर आलेल्या ठाकरे – पवार सरकारच्या कामगिरीवर जनतेचे शिक्कामोर्तब होईल, असा दावा महाविकास आघाडीने केला आहे.pandharpur – mangalvedha bypolls under corona threat

    राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. राजकीय साठमारीत सर्वच पक्षांना कोरोनाचा विसर पडला आणि आता सर्व नियम डावलून झालेल्या प्रचारामुळे आता हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत असे भयानक चित्र आज तयार झाले आहे.



     

    रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने मतदारातही घाबरून गेले आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात काट्याची टक्कर होत असून उद्या कोरोनाच्या छायेत कसे मतदान होणार यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे .

    अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भल्या मोठ्या सभांचा दणका उठवला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नंतर विजय द्या राज्यातली सत्ता बदलू असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठ – मोठ्या सभा घेतल्या.

    कोरोनाची स्थिती भयानक

    सध्या पंढरपूर परिसरात एकही हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसून क्षमतेपेक्षा दुप्पट कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून कालपर्यंत मतदारसंघात तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

    पंढरपूर – मंगळवेढ्यात हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने नागरिक अकलूज , सांगोला , सोलापूर अशा ठिकाणी मिळेल त्या किंमतीने बेड मिळविण्यासाठी फिरत आहेत. रेमेडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा इतका भासू लागला असून वाटेल त्या किमतीत ती मिळविण्याचा प्रयत्न नागरिक करू लागले आहेत.

    तीच अवस्था ऑक्सिजनची झाली असून अनेक हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडर पुरवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. या परिस्थितीचा मतदानाचा टक्केवारीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    pandharpur – mangalvedha bypolls under corona threat

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!