• Download App
    पंढरपूर : जनहित शेतकरी संघटनेने अनिल परब यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन । Pandharpur: Janhit Shetkari Sanghatana cremated a symbolic statue of Anil Parab

    पंढरपूर : जनहित शेतकरी संघटनेने अनिल परब यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

    जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात हे आंदोलन केले. Pandharpur: Janhit Shetkari Sanghatana cremated a symbolic statue of Anil Parab


    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.या संपाला जनहित शेतकरी संघटनेने पाठिंबा देत परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे नुकतेच दहन केले. या संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात हे आंदोलन केले.

    राज्य सरकारने तातडीने एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे. अन्यथा सरकार विरोधात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पंढरपूर येथे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला आहे.



    संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. ग्रामीण भागातील लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.दरम्यान आता शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे देशमुख यांनी म्हटलं.

    Pandharpur: Janhit Shetkari Sanghatana cremated a symbolic statue of Anil Parab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस