• Download App
    सीमेवरील ऑक्सिजन टॅँकर आणि कोल्हापूर- सातारा जिल्हाधिकारी भिडले|Oxygen tanker at the border and Kolhapur-Satara Collector clashed

    सीमेवरील ऑक्सिजन टॅँकर आणि कोल्हापूर- सातारा जिल्हाधिकारी भिडले

    कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांमध्येही वाद सुरू झाला आहे. ऑक्सिजन कोणाला मिळावा यासाठी कोल्हापूरआणि सातारा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारीच एकमेंकाशी भिडले.Oxygen tanker at the border and Kolhapur-Satara Collector clashed


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांमध्येही वाद सुरू झाला आहे. ऑक्सिजन कोणाला मिळावा यासाठी कोल्हापूरआणि सातारा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारीच एकमेंकाशी भिडले.

    राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, शहर प्रशासन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपडत आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजन चा टँकर अडवला. यावरुन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाºयांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाला.



    ऑक्सिजनचा टँकर आमचाच असल्याचा दावा कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे सध्या टँकर पोलीस बंदोबस्तात उभा आहे. ही घटना साताऱ्याच्या हद्दीवर घडली असून दोन जिल्हाधिकाऱ्यांची उच्च पातळीवर चर्चा झाली.

    ऑक्सिजन टँकरवरुन वाद झाल्यानंतर फोनाफोनी केल्यानंतर तो टँकर सातारचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी दोन टँकर निघाले होते. एका टँकरचा संपर्क तुटल्यामुळे ही गफलत झाली असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरुन दिली.

    तर संबधित टँकरचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाशी काही संबध नाही. तो टँकर कोल्हापुरातल्या प्रायव्हेट उत्पादकाचा आहे. त्यातील आॅक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र टँकर येत आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

    Oxygen tanker at the border and Kolhapur-Satara Collector clashed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही