ऑक्सिजन अभावी प्राण तळमलत असलेल्या महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रसे रवाना झाली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विझागवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. रेल्वेने देशातील सर्व नागरिकांच्या भल्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणं आणि नावीन्यपूर्ण कामे करुन कठीण काळात देशाची सेवा केली आहे, असं ट्वीट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केले आहे.Oxygen Express leaves for Maharashtra with oxygen, Railway Minister Piyush Goyal informed
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑक्सिजन अभावी प्राण तळमलत असलेल्या महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रसे रवाना झाली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विझागवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे.
रेल्वेने देशातील सर्व नागरिकांच्या भल्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणं आणि नावीन्यपूर्ण कामे करुन कठीण काळात देशाची सेवा केली आहे, असं ट्वीट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केले आहे.
राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लांटमधून ऑक्सिजन राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली.त्यानंतर या एक्सप्रेसवरील सात रिकाम्या टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आला.
त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ही एक्सप्रेस विझागवरुन रवाना झाली आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत ही स्पेशल रेल्वे नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक टँकरमध्ये 15 ते 20 टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे.
त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्राला जवळपास 100 टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे. सकाळी ही ट्रेन विशाखापट्टणम इथं दाखल झाल्यानंतर सर्व टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरणे, वजन करणे आणि सुरक्षेची खात्री करण्यासाठी 20 तासांचा अवधी लागू शकतो .
राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात आली आहे.
महाराष्ट्राला विशाखापट्टणम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
नितीन गडकरी यांचा पुढाकार
नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळणार आहे. येत्या काही दिवसांत विशाखापट्टणम यथून पुरवठा सुरु होईल,
त्यामुळं विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे. भिलाईमधूनही ६० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे. तसंच, ५०हुन अधिक बेडची क्षमता असणाºया रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याची विनंतीही गडकरींनी रुग्णालयांना केली आहे.
Oxygen Express leaves for Maharashtra with oxygen, Railway Minister Piyush Goyal informed
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी रद्द केल्या उद्या होणाऱ्या बंगालमधील सर्व सभा, कोरोना परिस्थितीवर घेणार उच्चस्तरीय बैठक
- अनास्थेचा परिणाम : जानेवारीतच केंद्राने कोरोना लाटेचा राज्यांना दिला होता इशारा, दुर्लक्षामुळे महामारीचा झाला उद्रेक
- ‘जिथे कमी तिथे आम्ही’ : ऑक्सिजनसाठी कॉर्पोरेट- सरकारी कंपन्यांचा पुढाकार, टाटा-रिलायन्ससह अनेक कंपन्या मैदानात
- ‘या पापी समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’ म्हणत न्यायालयानेदेखील महाराष्ट्र सरकारपुढे टेकले हात
- पाकिस्तानात चिनी राजदूत थांबलेल्या हॉटेलमध्ये तेहरिक ए तालिबानकडून बॉम्बस्फोट, ४ जण ठार, १२ जखमी