वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात आता ऑक्सिजनची मागणी निम्म्यावर आली आहे. पुरवठा वाढल्याने आणि रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्याचा हा परिणाम आहे. Oxygen demand halves in Pune; Big impact of declining patient numbers
एप्रिल महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा होता. परंतु, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या घटत गेल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली. ऑक्सिजनचा पुरवठा वाढला आणि मागणी ५० टक्क्यांवर आली आहे. पूर्वी २५० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजनची मागणी होती. ती आता निम्म्यावर आल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी सांगितले.
तीन ऑक्सिजन प्लांट सुरु
पालिकेने तीन ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. मुरलीधर लायगुडे दवाखाना, दळवी रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि बाणेर जम्बो कोविड सेंटरमध्ये येथे हे पहिल्या टप्प्यात प्लांट उभारले आहेत. यातील, लायगुडे, दळवी आणि नायडूमधील प्लांट सुरू झाले आहेत. तर, बाणेर येथील काम सुरू होणार आहे. तर, खेडेकर, बाणेर, वारजे, नायडू आणि इंदिरानगर येथील रुग्णालयांमध्येही आणखी सहा प्रकल्प प्रस्तावित आहेत.
Oxygen demand halves in Pune; Big impact of declining patient numbers
महत्त्वाच्या बातम्या
- CYBER CRIME : केंद्र सरकारचा Fake News तपासणी करणारा विभागही cyber crime च्या विळख्यात ; PIB ची बनावट वेबसाईट उघड
- आकुर्डीमध्ये दोन सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू, कर्ती मुले गमावल्याने कुटुंबावर दु;खाचा डोंगर
- शेतकरी कंटाळले अन् संघटनांचा आंदोलनाचा इशारा, उद्धव ठाकरे,ममतांसह विरोधी पक्षांचेही पाठिंब्यांचे राजकारण, २६ मे रोजी देशभर निदर्शने,